बारामती तालुक्यातील काऱ्हाटीत सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक

जळोची : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उभारण्यात आलेल्या फलकावर अज्ञात समाजकंटकाने शाईफेक केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान फलकावर शाई फेकल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक उतरवला.
काऱ्हाटीतील एका शेती फार्म मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन कोणीतरी शाई फेकल्याचे आज सकाळी निदर्शनास आले.
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षातून सुनेत्रा पवार या लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवार असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या फलक उभारले जात असून, त्यापैकी एका फ्लेक्स वर काऱ्हाटी गावात शाई फेकल्याने येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला आपला उमेदवार उभा करणार असल्याचे जाहीर केले आहे. पवार यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले नसले तरी.. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेसाठी उमेदवार असणार असल्याच्या चर्चा आहेत.
याच पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांना लोकसभेसाठी प्रचंड मतांनी विजयी करा या आशयाचा फलक त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला होता.. मात्र या फलकावर अज्ञातांनी शाई फेक केल्याचा प्रकार घडला आहे.. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांचा फोटो आहे.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता, सुळे म्हणाले की सदर प्रकार चुकीचा असून हे कृत्य ज्याने कोणी केले असेल त्याची चौकशी झाली पाहिजे.. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली..





