Skydiving plane crash: उड्डाणानंतर स्कायडायव्हिंगचे विमान कोसळले ; वैमानिकासह १२ जणांचा मृत्यू
Skydiving plane crash: अमेरिकेच्या मिसुरी राज्यातून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. ज्याठिकाणी रविवारी स्कायडायव्हिंग विमान टेक ऑफच्या काही वेळातच नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळल्याची घटना समोर आली आहे.

Skydiving plane crash: अमेरिकेच्या मिसुरी राज्यातून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. ज्याठिकाणी रविवारी स्कायडायव्हिंग विमान टेक ऑफच्या काही वेळातच नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात पायलटसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघाताबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी, रविवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:34 वाजता मिसूरी याठिकाणी बटलर मेमोरियल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच पॅसिफिक एरोस्पेस P650 विमान तांत्रिक बिघाडामुळे किंवा अज्ञात कारणांमुळे कोसळले, त्यात पायलट आणि 11 स्कायडायव्हर्ससह सर्व 12 जणांचा मृत्यू झाला” अशी माहिती दिली आहे. (Skydiving plane crash)
मिसूरी स्टेट हायवे पेट्रोल आणि बेट्स काउंटी आपत्कालीन व्यवस्थापनानुसार, कॅन्सस सिटीच्या दक्षिणेस सुमारे 60 मैल अंतरावर असलेल्या बटलर सिटी विमानतळाजवळ हा भीषण अपघात झाला. उड्डाणानंतर विमान कोसळल्याची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
मिसूरी स्टेट हायवे पेट्रोलने या दुःखद घटनेची अधिकृत माहिती सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे शेअर केली आहे. एजन्सीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्राथमिक अहवालानुसार, विमानात उपस्थित एकूण 12 लोक या अपघाताचे बळी ठरले आहेत आणि कोणीही वाचण्याची अपेक्षा नाही.
स्थानिक टेलिव्हिजन स्टेशन फॉक्स 4 शी बोलताना, बेट्स काउंटीच्या आपत्कालीन व्यवस्थापनाच्या प्रवक्त्याने पीडितांच्या ओळखीची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की विमानात एकूण 12 लोक होते, त्यापैकी 11 जणांना स्कायडायव्हिंगची आवड होती आणि एक विमानाचा पायलट होता. (Skydiving plane crash)
यूएस एव्हिएशन रेग्युलेटर FAA ने सांगितले की पॅसिफिक एरोस्पेस P750 विमानाने बटलर मेमोरियल विमानतळावरून उड्डाण करताच थोड्याच अंतरावर ते क्रॅश झाले. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता, नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने (NTSB) तपासाची जबाबदारी घेतली आहे आणि ते पुढील अपडेट जारी करतील.





