अमेरिकेत आणखी एक विमान अपघात ; दोन विमानांची हवेत जोरदार टक्कर

US Arizona Plane Crash । अमेरिकेतील अॅरिझोना याठिकाणी दोन लहान विमानांची हवेत जोरदार धडक झाल्याने मोठा अपघात झाल्याची समोर येत आहे. यावेळी विमाने हवेत धडकल्याने किमान दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. टक्सनच्या बाहेरील विमानतळाजवळ झालेल्या अपघाताची चौकशी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने सुरू केली आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, माराणा पोलिस विभागाच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर २ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
अलिकडच्या काळात अमेरिकेत चार मोठे विमान अपघात झाले आहेत. सर्वात अलीकडील घटना म्हणजे टोरंटोमध्ये लँडिंग करताना डेल्टा जेट उलटले. मात्र विमानातील सर्व ८० जणांना वाचवण्यात यश आले. याशिवाय अलास्कामध्ये विमान अपघात झाला. जानेवारीच्या अखेरीस, वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन एअरलाइन्सचे प्रवासी विमान आणि लष्करी हेलिकॉप्टर यांच्यातील टक्करमध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला.
वैद्यकीय वाहतूक जेट अपघात US Arizona Plane Crash ।
३१ जानेवारी रोजी, एक वैद्यकीय वाहतूक जेट कोसळले, त्यात सात जणांचा मृत्यू झाला आणि १९ जण जखमी झाले. एक रुग्ण त्याच्या मुलासह आणि पत्नीसह इतर चार लोकांसह वैद्यकीय वाहतूक जेटमध्ये प्रवास करत होता. तथापि, फिलाडेल्फियामध्येच त्याचा अपघात झाला.
तपास प्रक्रिया
राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने या ताज्या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. स्थानिक अधिकारी आणि तपासकर्त्यांचे एक पथक अपघात कसा झाला आणि तो मानवी चुकीमुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे झाला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अपघात झाला तेव्हा आकाश निरभ्र होते, त्यामुळे हवामानाशी संबंधित कोणतीही समस्या नसल्याचे मानले जात आहे.
विमान वाहतुकीच्या सुरक्षेवर वाढती भर US Arizona Plane Crash ।
या सततच्या घटनांमुळे, अमेरिका आणि उत्तर अमेरिकेत विमान वाहतूक सुरक्षेवर तीव्र चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत झालेल्या अपघातांमुळे विमान वाहतूक उद्योग आणि सुरक्षा तज्ञ चिंतेत पडले आहेत. अशा अपघातांना तोंड देण्यासाठी, उड्डाण सुरक्षेबाबत अधिक कडक नियम बनवले जात आहेत.





