उरीमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार
Updated On:

श्रीनगर – भारतीय लष्कर आणि संयुक्त सुरक्षा दलांनी शनिवारी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील गोहलन भागात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी उरीजवळ दोन दहशतवाद्यांना ठार करण्यातही सुरक्षा दलांना यश आले आहे.
हे दोघेही घुसखोरीचा प्रयत्न करत होते. सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची सुरक्षा दलाकडून ओळख पटवण्यात येत आहे.
दरम्यान, बालमुल्ला येथे बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दोघेही तस्कर-ए-तैयबाशी संबंधित होते.





