पिंपरी | मराठवाडा मित्रमंडळतर्फे विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा

पिंपरी, (प्रतिनिधी) – मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निकमध्ये पिंपरी चिंचवडच्या विविध शाळांतील दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा 6 दिवसांची होती व यामध्ये इंजिनिअरिंगच्या विविध आधुनिक संकल्पना जसे की रोबोटिक्स,
इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, वेब पेज डिझाईनिंग वा हार्डवेअर नेटवर्किंग, इलेक्ट्रिक वाहन, ऑटो कॅडचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले गेले. या कार्यशाळेचे प्रशिक्षण महाविद्यालयातील व्याख्यात्यांनी दिले. कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्या गीता जोशी यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन ज्योतिराम रणदिवे व संदीप घोघरे यांनी केले.
या कार्यशाळेचा लाभ 60 विद्यार्थ्यांना पहिल्या बॅचमध्ये झालेला असून दुसर्या बॅचसाठी 120 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली अहे. तसेच तिसरी बॅच 24 मे रोजी सुरू होणार असून ह्या कौशल्यविकास कार्यशाळेची अधिक माहिती महाविद्यालयाचा संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





