Sitaram Dalvi : बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार हरपले.! माजी आमदार ‘सिताराम दळवी’ यांचे निधन

Sitaram Dalvi passed away – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार अशी ओळख असलेले माजी आमदार सिताराम दळवी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते.
शिवेसेनेच्या उभारतीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता. त्यामुळे सिताराम दळवी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
सिताराम दळवी हे शिवसेनेचे जुने शिलेदार होते. ते अंधेरी विधानसभा मतदारसंघातून 1995 ला शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. त्यापुर्वी मुंबई महापालिकेत नगसेवक होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते. शिवेसेनेच्या उभारतीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता.
तसेच विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबध होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील आरोस हे सिताराम दळवी यांचे मुळ गाव असून ते मुंबईतील अंधेरी पूर्व येथे अखेरपर्यंत वास्तव्यास होते.
सिताराम दळवी हे मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडील होत. दळवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नी शिला, मुलगा संदिप, मुलगी प्रतिमा आणि सुन नातवंडे असा परिवार आहे.





