‘ऊई अम्मा हाय हाय’ गाण्यानंतर राशाचे तेलगू चित्रपटात पदार्पण
Rasha Thadani | अभिनेत्री रवीना टंडनची कन्या राशा थडानीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहे. अलीकडेच तिने ‘आझाद’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यात अभिनेता अजय देवेगण मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी यातील राशाच्या ‘ऊई अम्मा हाय हाय’ या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या गाण्यामुळे राशाचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. यानंतर आता तिला अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सची ऑफर मिळत आहे. आता ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळाली आहे. लवकरच ती तेलुगू चित्रपटात पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ती सुपरस्टार महेश बाबू यांचा पुतण्या आणि दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माता रमेश बाबू यांचा मुलगा जय कृष्णा घट्टामनेनी याच्या सोबत तेलुगू चित्रपटात पदार्पण करणार आहे. महेश बाबूच्या पुतण्या ही नायक म्हणून पहिलीच फिल्म असणार आहे. ‘RX100’ आणि ‘मंगलवारम’ यांसारखे हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक अजय भूपति या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तेलुगू चित्रपटसृष्टीत नवे चेहरे सादर करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे.
जय कृष्णा आणि राशा थडानी यांच्या या चित्रपटाचे निर्मिती वैजयंती मूव्हीज आणि आनंदी आर्ट क्रिएशन्सच्या बॅनरखाली होणार आहे. विशेष म्हणजे, वैजयंती मूव्हीजने यापूर्वी ‘सीता रामम’ आणि ‘कल्कि 2898 AD’ यांसारखे चित्रपट दिले आहेत. Rasha Thadani |
चित्रपटाचे शूटिंग दसऱ्यानंतर सुरू होणार
या चित्रपटाचे चित्रीकरण दसऱ्यानंतर, साधारण 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि लवकरच निर्माते याची घोषणा करण्याची शक्यता आहे. राशा थडानी या चित्रपटाव्यतिरिक्त ‘लाईके लायका’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय, ती इब्राहिम अली खानसोबत देखील नव्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. Rasha Thadani |
हेही वाचा:
Malvika Raaj : ‘कभी खुशी कभी गम’मधली ‘लहान पू’ आई बनली ! मालविका राजच्या घरी किलबिल





