Sitaare Zameen Par: बॉलीवूडमधील परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाणारे आमिर खान लवकरच आपला नवा चित्रपट ‘सितारे जमीन पर’ ओटीटी मंचावर आणणार आहेत. यावर्षी जून महिन्यात हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. त्यानंतर प्रेक्षकांसाठी तो यूट्यूबवर उपलब्ध करण्यात आला होता. आता तो लवकरच ओटीटीवरही प्रेक्षकांसमोर येणार आहे. ओटीटीवरील ऑफर नाकारली होती याआधी आमिर खान यांना एका ओटीटी मंचाकडून या चित्रपटासाठी तब्बल १२५ कोटी रुपयांची ऑफर आली होती. मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली. कारण स्पष्ट करताना आमिर म्हणाले होते की ते चित्रपटगृह व्यवसायाचे संरक्षण करू इच्छितात. म्हणूनच त्यांनी चित्रपट लगेच ओटीटीवर आणला नाही. एका मुलाखतीत आमिर यांनी सांगितले , “मी कधीच असं म्हटलं नव्हतं की माझा चित्रपट ओटीटीवर येणार नाही. परंतु मला एवढेच वाटते की चित्रपटगृहांत प्रदर्शित झाल्यानंतर लगेच आठ आठवड्यांत चित्रपट ओटीटीवर येऊ नये. हा कालावधी किमान सहा ते आठ महिने असावा. मी स्वतः ओटीटीवर चित्रपट पाहतो.” यूट्यूबवरील कमाईबाबत आमिर यांचे मत अमिर यांनी सांगितले की पे पर व्ह्यू मॉडेल अजूनही वाढीच्या टप्प्यात आहे. या पद्धतीतून चित्रपटाने चांगली कमाई केली असून, साधारणपणे वीस पट अधिक नफा झाला. मात्र या कमाईची १२५ कोटी रुपयांच्या ओटीटी ऑफरशी तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. बॉक्स ऑफिसवरील कामगिरी भारतातील कमाई : ₹१६५.६७ कोटी जागतिक कमाई : ₹२६६ कोटी या चित्रपटात आमिर खान यांच्यासोबत जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत असून, दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे. एकूणच, ‘सितारे जमीन पर’ चित्रपटगृह आणि यूट्यूबनंतर आता ओटीटीवर झळकणार असल्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा हा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.