“कधीतरी शांत बसावं…”; केदार शिंदे यांच्या पोस्टने वेधलं साऱ्यांचे लक्ष

Kedar Shinde | अभिनेते आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरले आहे. त्यांच्या मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. यानंतर सोशल मीडियावर सक्रिय असलेले केदार शिंदे यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लिहिले आहे की, “कधीतरी शांत बसावं असं वाटत. आजूबाजूच्या गोंगाटात एकटं राहावं असं वाटतं. पण मग आठवण होते जबाबदाऱ्यांची! घरच्या बाहेरच्या सगळ्यांचीच. कितीही स्वतः ला सिध्द करा… अपुर्णतेचा आनंद वेगळाच असतो. काय केलंय आजपर्यंत त्यापेक्षा काय करू शकतो? याचा विचार अवर्णनीय असतो. रोजची सकाळ उगवते ती पुन्हा जन्म देण्यासाठी!!” केदार शिंदे यांच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. सोबतच त्यांनी स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. Kedar Shinde |
View this post on Instagram
केदार शिंदेंच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. केदार शिंदेंनी पोस्टमधून व्यक्त केलेले विचारांचे अनेकांनी समर्थन केले आहे. केदार शिंदे यांच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर केदार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी ‘आईपण भारी देवा’ या आगामी सिनेमाची घोषणा केली. २०२५ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे त्यांच्या या आगामी चित्रपटासाठी देखील प्रेक्षक आतुर आहेत. Kedar Shinde |
हेही वाचा:
राहुल गांधींच्या “राष्ट्रीय आपत्ती” ‘या’ विधानावर ‘वाद’ पेटला, भाजपने दिले ‘उत्तर’





