Ashok Kharat Case : अटक करण्यात आलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीची आज पहिली पत्रकार परिषद पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी घेतली. या पत्रकार परिषदेत सातपुते यांनी आत्तापर्यंतच्या तपासाबाबत माहिती दिली आहे. (Ashok Kharat Case) सातपूते यांनी माहीती दिली की, खरातला 17 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्याला पहिल्या गुन्ह्यात 14 दिवसांची, तर दुसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये महिला अत्याचाराचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 4 गुन्हे आहेत. यातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात 10 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 8 गुन्हे लैगिक शोषणाचे तर 2 गुन्हे फसवणुकीचे आहेत. याव्यतिरिक्त शिर्डी आणि रहाता या दोन ठिकाणी प्रत्येकी एक गुन्हा दाखल असून, दोन्ही गुन्हे फसवणुकीचे आहेत. या दोन्ही गुन्ह्याचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत. राहता येथील गुन्हा देखील शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. (Ashok Kharat Case) सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसात खरातने राजेंद्र जासूद आणि दिनेश परब याच्या विरोधात 5 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तर शिर्डी पोलिसांत खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवविरोधात एका महिलेने बनावट व्हिडीओ व्हायरल करायची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता. या दोन गुन्ह्यामुळे खरातचे बिंग फुटले आणि हळूहळू कारवाईला सुरवात झाली. या दोन्ही गुन्ह्यानंतर एसआयटीची स्थापना केली गेली, अशी माहिती त्यांनी दिली. या तपासादरम्यान, 30 पेक्षा अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता, असे समोर आले आहे. खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधिंच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवत होता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचे लैंगिक शोषण करत होता. त्याने ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचे कामही खरात करत होता, अशी माहिती सातपुते यांनी दिली. (Ashok Kharat Case) तपासासाठी २४ अधिकारी तसेच, या प्रकरणी 20 मार्चसा तपास सुरू केला आहे. एकूण 11 गुन्हे एसआयटीकडे तपासासाठी आहेत. तपास पथकामध्ये दोन पोलीस उपाधीक्षक, सहाय्यक तपास अधिकारी म्हणून तीन पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असे एकूण 24 अधिकार्यांचे हे विशेष पथक तपासासाठी कार्यरत आहे, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली. (Ashok Kharat Case)