Accident Deaths : सिन्नर तालुक्यातील पंचाळे-शहा रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडून चार जणांचा जळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंचाळे गावातील एक आदिवासी कुटुंब धार्मिक कार्यक्रम आटोपून पिकअप व्हॅनने घरी परतत होते. याचदरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रकने पिकअप व्हॅनला तब्बल १०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. (Accident Deaths) या घर्षणामुळे वाहनाच्या टायरने पेट घेतला आणि काही क्षणांतच संपूर्ण पिकअप व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. (Accident Deaths) या आगीत पिकअपमधील चार जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली तरीही काहीच करता आले नाही. धार्मिक कार्यक्रमावरून परतताना झालेल्या या दुर्घटनेमुळे पंचाळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident Deaths)