Singham Again : दीपिका नंतर ‘सिंघम अगेन’ मधील करीना कपूरचा डॅशिंग लूक आऊट

Kareena Kapoor – दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) लवकरच ‘सिंघम अगेन’ (Singham Again) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
दोन दिवसांपूर्वीच या चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची दमदार एंट्री झाली. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यातील त्याच्या धमाकेदार लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
View this post on Instagram
मात्र, अश्यातच या चित्रपटातील आणखी एक पोस्टर समोर आलं असून बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) खाननेही देखील रोहित शेट्टीच्या या सिनेमात प्रवेश केला आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील रणवीर , टायगर आणि दीपिकाच्या लूकचा फोटो शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता निर्मात्यांनी करीना कपूरचा (Kareena Kapoor) देखील लूक प्रदर्शित केला आहे. करीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटातील तिच्या लूकची ओळख करून दिली आहे.
हा फोटो शेअर करताना करिनाने (Kareena Kapoor लिहिले आहे की, ‘आज मी तुम्हा सर्वांना सिंघमच्या सर्वात मोठ्या शक्तीची ओळख करून देणार आहे. अवनी बाजीराव सिंघम असे तिचे नाव आहे’. असं तिने कॅप्शन दिल आहे. पोस्टर मध्ये करीनाच्या चेहऱ्यावर जखमा आणि हातात बंदूक घेऊन दिसली. यामध्ये तिचा अत्यंत तीव्र लूक पाहायला मिळत आहे.





