Singham Again : जखमी सिंह विनाश करतो.! बाजीराव सिंघमचा दमदार लूक प्रदर्शित

Singham Again – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम’ (Singham) चित्रपट सुपरहिट ठरला होता. या सिनेमाच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता दिग्दर्शक रोहित शेट्टी या सिनेमाचा तिसरा भाग घेऊन येणार आहे.
या चित्रपटाचे नाव ‘सिंघम अगेन’ (Singham Again) असे आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी अनेक प्रोजेक्ट एकत्र केले आहेत.
त्यांच्या ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न्स’, सिम्बा’ या सारखे चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, आता लवकरच त्यांचा बहुचर्चित ‘सिंघम अगेन’ (Singham Again) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील मुख्य अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याचा फर्स्ट लूक समोर असून, प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहचली आहे.
चित्रपटातील सर्व कलाकारांची पात्रे आणि फर्स्ट लूकचे पोस्टर्स एकापाठोपाठ एक रिलीज होत आहेत. ‘सिंघम अगेन’मधील रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि करीना कपूरनंतर आता सिनेमाचा खरा नायक बाजीराव सिंघम म्हणजेच अजय देवगणचा (Ajay Devgn) फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.
अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवर सिंघम अगेनमधील स्वतःचा पहिला लूक शेअर केला आहे. यामध्ये तो सिंहासारखा गर्जना करताना आणि एकदम भडकलेल्या लूकमध्ये दिसत आहे. रोहित शेट्टीनेही हे पोस्टर शेअर करत लिहिले आहे की, ‘सिंह दहशत निर्माण करतो आणि जखमी सिंह विनाश करतो. सर्वांचा आवडता पोलीस बाजीराव सिंघम परत आला आहेत. सिंघम अगेन….’ असं म्हंटल आहे.





