गायिका श्रेया घोषालचे एक्स अकाउंट हॅक; चाहत्यांना केले आवाहन

Shreya Ghoshal | बॉलीवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने आपल्या गोड आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. तिच्या कॉन्सर्टला देखील प्रेक्षकांची मोठी गर्दी असते. मात्र सध्या श्रेया एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. श्रेया घोषालचे एक्स अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तिने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
श्रेयाने पोस्टमध्ये लिहिले की, “सर्वांना नमस्कार, १३ फेब्रुवारीपासून माझं एक्स अकाउंट हॅक झालं आहे. मी माझ्याकडून एक्स टीमला संपर्क करण्याचे बरेच प्रयत्न केले. पण, फक्त ऑटो जनरेटेड प्रतिक्रियांशिवाय मला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही. त्यामुळे मला माझं एक्स अकाउंट डिलीटही करता येत नाही. कारण मी लॉगिन करु शकत नाही.”
View this post on Instagram
;
पुढे तिने चाहत्यांना आवाहन केले की, “कृपया अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. शिवाय त्यासंदर्भात आलेल्या कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. या सर्व स्पॅम आणि फिशिंग लिंक आहेत. माझं अकाउंट पुर्नप्राप्त झाल्यास मी तुम्हाला याबाबत अपडेट देईल,” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. Shreya Ghoshal |
दरम्यान, श्रेयाने हिंदी, मराठी इतर काही भाषांमध्ये देखील गाणे गायिली आहेत. आतापर्यंत श्रेयाने 1 हजाराहून अधिक बॉलिवूड गाणी गायली आहेत. तिच्या गाण्याला रसिक वर्गाचा देखील मोठा प्रतिसाद मिळतो. Shreya Ghoshal |
हेही वाचा:





