“ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना मारण्यापासून स्वतःला कसं रोखलं?” ; ट्रम्प-झेलेन्स्की यांच्या वादावर रशियाची खोचक प्रतिक्रिया

Russia on Trump-Zelensky Clash । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात ओव्हल ऑफिसमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले. दोन्ही नेत्यांमध्ये ऑन कॅमेरा शाब्दिक वाद झाल्याचे जगाने पाहिले. आता या वादानंतर शांतता करार बिघडला आहे. मात्र या सर्व घटनेत युक्रेनचा शत्रू असणारा राष्ट्र म्हणजे रशियाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही प्रतिक्रिया देताना रशियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भरभरून कौतुक केले आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झेलेन्स्की यांची जोरदार बाचाबाची झाली. दोघांमध्ये संभाषण चालू असताना ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचा ‘मूर्ख राष्ट्राध्यक्ष’ असा उल्लेख केल्याचे दिसले. दरम्यान, ट्रम्प व झेलेन्स्की यांच्यातील वादाचा व्हिडीओ सोषसील मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर संपूर्ण जगातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच रशियाने यावर “झेलेन्स्की यांना जे मिळायला हवं होतं तेच मिळालं”. असे म्हटले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने, “आम्हाला प्रश्न पडला आहे की झेलेन्स्की ज्या पद्धतीने ट्रम्प यांच्याशी बोलत होते ते पाहून ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना मारण्यापासून स्वतःला कसं रोखलं?” असे खोचकपणे म्हटले आहे.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोव्ह यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी,”व्हाइट हाऊसमध्ये झेलेन्स्की ट्रम्प यांच्यासमोर असत्य कथन करत होते. त्यांची खोटी वक्तव्ये ऐकून ट्रम्प व उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी झेलेन्स्की यांना मारलं कसं नाही याचं आम्हाला नवल वाटतंय.” असे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला रशियाचे माजी अध्यक्ष दिमीत्री मेदवेदेव यांनी देखील या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मेदवेदेव म्हणाले, “झेलेन्स्की व युक्रेनला ज्या गोष्टीची गरज होती तेच अमेरिकेने त्यांना दिलं आहे.”
त्यामुळे ट्रम्प झेलेन्स्कीवर संतापले Russia on Trump-Zelensky Clash ।
डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेनने कोणत्याही किंमतीत युद्ध रोखण्यासाठी तयार व्हावे अशी इच्छा होती, म्हणूनच त्यांनी झेलेन्स्की यांना अमेरिका दौऱ्यावर बोलावले होते. परंतु, झेलेन्स्की पुतिन यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडीसाठी तयार दिसत नव्हते. संभाषणादरम्यान, त्यांनी पुतिन यांना खुनी देखील म्हटलं. त्यांच्या या वर्तणुकीमुळे ट्रम्प खूप संतापल्याचं पाहायला मिळालं.
युक्रेनला ‘या’ देशांचा पाठिंबा Russia on Trump-Zelensky Clash ।
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाला आक्रमक म्हणत, ‘रशिया हा आक्रमक आहे आणि युक्रेन हा बळी पडलेला राष्ट्र आहे.’ युक्रेन आपल्या प्रतिष्ठेसाठी, स्वातंत्र्यासाठी, आपल्या मुलांच्या आणि युरोपच्या सुरक्षेसाठी लढत आहे, असेही त्यांनी सांगितले.
तर जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी युक्रेनला आश्वासन देत युक्रेन जर्मनी आणि युरोपवर अवलंबून राहू शकतो. स्पेन आणि पोलंडच्या पंतप्रधानांनीही झेलेन्स्की यांच्याशी एकता व्यक्त करत “तुम्ही एकटे नाही आहात.” असे म्हणत त्यांच्या सोबत आपण असल्याचे म्हटले आहे.
तर युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी उत्तर दिले : “प्रिय राष्ट्रपती, तुम्ही कधीही एकटे नसता.” “तुमची प्रतिष्ठा युक्रेनियन लोकांच्या शौर्याचा सन्मान करते. बलवान व्हा, शूर व्हा, निर्भय व्हा. न्याय्य आणि शाश्वत शांततेसाठी आम्ही तुमच्यासोबत काम करत राहू,” असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर युक्रेनला समर्थन देणारी पोस्ट केली आहे.





