डेन्मार्क स्पर्धेतून सिंधूची माघार
Updated On:

नवी दिल्ली – भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने डेन्मार्क ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. करोनाचा धोका पत्करुन स्पर्धेत सहभागी होण्याची मानसिक तयारी नसल्याचे तीने सांगितले.
ही स्पर्धा ओडेन्सेमध्ये येत्या 13 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. डेन्मार्क येथेच होणाऱ्या थॉमस आणि उबर चषक बॅडमिंटन स्पर्धा रद्द झाल्यामुळे डेन्मार्क स्पर्धेत खेळून धोका पत्करण्यापेक्षा माघार घेणेच योग्य असल्याचे मतही तिने व्यक्त केले.





