Lok Sabha Election 2024 । दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी रणशिंग फुंकले आहे.अशात नुकतीच गांधी मैदान येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या प्रचारसभेत पुन्हा एकदा लंके यांचा साधेपणा चर्चेत आला आहे.
या सभेत महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आ. अदित्य ठाकरे, आ. रोहीत पवार, आ.राहुल जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, योगीता राजळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे, यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर मान्यवरांची गर्दी झाल्यामुळे बसण्यासाठी खुर्च्या अपुऱ्या पडल्या. तेव्हा निलेश लंके यांनी आपण लोकसभेचे उमेदवार आहोत, आपल्यासाठी ही प्रचारसभा घेतली जात आहे, याची कोणतीही तमा न बाळगता थेट जमिनीवर बसकण मारली. सभेत इतर वक्त्यांची भाषणं सुरु असताना निलेश लंके स्टेजच्या एका कोपऱ्यात खाली मांडी घालून बसले होते. सभेतील या दृश्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा राहिली.
Lok Sabha Election 2024 । या सभेत निलेश लंके म्हणाले…
‘जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने बहुतांश तालुक्यात नागरिकांशी संवाद साधतांना तेथील प्रश्नांचे गांभिर्य लक्षात आले. गेल्या पाच वर्षात येथील प्र्श्न सुटले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या, हे प्र्श्न सोडविण्यासाठी आणि नगर दक्षिणेचे वैभव पुन्हा परत मिळविण्यासाठी मला एकवार मतदार मायबापांनी एक संधी द्या’ असे भावनीक आवाहन लंके यांनी केले.