Mirzapur : ‘मिर्झापूर‘ म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो बंदुकींचा धडाका, रक्तरंजित सत्ता संघर्ष, गुन्हेगारीचं साम्राज्य आणि ‘भौकाल’ निर्माण करणारी पात्रं! पंकज त्रिपाठींचा कालीन भैय्या, अली फजलचा गुड्डू पंडित आणि दिव्येंदु शर्माचा मुन्ना त्रिपाठी या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं.
या लोकप्रिय फ्रँचायझीतील केवळ मुख्य पात्रंच नव्हे, तर छोट्या-छोट्या भूमिका साकारणारे कलाकारही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. आता ‘मिर्झापूर: द मूव्ही’ मोठ्या पडद्यावर दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा या जुन्या पात्रांची आणि कलाकारांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.( Mirzapur )
याच चर्चेत ‘मिर्झापूर 3’मध्ये राधियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘प्रशंसा शर्मा’ हिचं नावही चर्चेत आलं आहे. पडद्यावर अत्यंत साध्या आणि सर्वसामान्य अंदाजात दिसणाऱ्या राधियाला प्रशंसाने इतक्या सहजतेने साकारलं की तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. .( Mirzapur )
मात्र, पडद्यावरची ही साधी राधिया आणि प्रत्यक्ष आयुष्यातील प्रशंसा शर्मा यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. अभिनेत्रीचे सोशल मीडिया फोटो पाहिल्यानंतर हा फरक आणखी प्रकर्षाने जाणवतो. .( Mirzapur )
प्रशंसा शर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती आपल्या चाहत्यांसोबत वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मॉडर्न आउटफिट्स, स्टायलिश फॅशन आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज पाहायला मिळतो.
त्यामुळे ‘मिर्झापूर’मधील राधियाला पाहिलेल्या चाहत्यांना प्रशंसाचा हा ग्लॅमरस अवतार पाहून आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. अभिनेत्रीचे सोशल मीडियावर लाखो चाहते असून, तिचे इंस्टाग्रामला तुफान फॉलोवर्स आहेत.









