Silver Oak Attack: जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई

मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानावर काल झालेल्या हल्ला प्रकरणात कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात त्रूटी दिसून आलेल्या आहेत. त्यासंदर्भात जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशा स्पष्ट शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना मी भेटलो, मुख्यमंत्र्यासोबत हीच चर्चा झाली की, काल जो काही प्रकार घडला त्याला नक्की कोण जबाबदार आहे. कुठे कमतरता राहिली, त्यावर पुढे काय निर्णय घ्यायचा या संदर्भात चर्चा केली आणि याबाबतची सगळी चौकशी करून योग्य तो निर्णय आम्ही त्यामध्ये घेऊ. असेही वळेस पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले, गुणवंतर सदावर्ते सविस्तर निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया देता येईल. आता सद्यस्थितीत न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. माझं एवढच सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे, की उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे आणि निर्णयाच्या नंतर काल जी घटना घडली. त्याप्रमाणे जो काही कायद्यानुसार निर्णय करणे आवश्यक होतं तो केलेला आहे. आता आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, सहकार्य करून त्यातून मार्ग काढला पाहिजे.





