satara | आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत दिप्ती घोरपडे यांना रजत पदक

सातारा, (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नेपाळमध्ये झालेल्या योगासन स्पर्धेत येथील दिप्ती सागर घोरपडे यांनी रजत पदक मिळवले. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दहावी इंडो नेपाळ आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा नेपाळची राजधानी काठमांडू येथे बोगन व्हिला हॉलमध्ये झाली.
या स्पर्धेमध्ये पारंपरिक योगासन रिदमिक एकेरी व दुहेरी प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धेचे उदघाटन नेपाळ ऑलम्पिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश श्रेष्ठ यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेमध्ये एंजल्स योगा सेंटरच्या ओनर, योग शिक्षिका दिप्ती घोरपडे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना पारंपरिक योगासन स्पर्धेमध्ये रजत पदक पटकावले.
या स्पर्धेला भारताकडून 44 स्पर्धकांनी भाग घेतला तर नेपाळच्याही 29 स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारताने पारंपरिक योगासन स्पर्धेमध्ये 14 सुवर्ण तर रिदमीकच्या स्पर्धेमध्ये 6 सुवर्ण पदके मिळवत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. स्पर्धा समन्वयक सुरेश गांधी यांनी सहकार्य केले. दिप्ती यांनी यापूर्वी योगासन स्पर्धेच्या पंच म्हणून काम पाहिले आहे.





