नाशिकमध्ये चांदीच्या बाप्पाची चोरी
Updated On:

नाशिक – आज अनंत चतुदर्शनिमित्त देशभरात गणरायाचे विसर्जन सुरु आहे. गणेश चतुर्थी दिवशी प्राणपतिष्ठापना केलेल्या श्री गणरायाचे आज विसर्जन करण्यात येत आहे. देशभरात जल्लोषाचे वातावरण सुरु आहे. मात्र अशातच चांदीचा बाप्पा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी येथून गणेश मंडळाची चांदीची गणेशमूर्ती चोरीला गेली आहे.
अनंत चतुर्दशी दिवशीच घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे गणेश भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पहाटेच्या सुमारास ही चोरी झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. काही स्थानिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.





