“सिद्धूची मराठी फिल्म…” सिद्धार्थ जाधवसाठी जॅकलिन चक्क बोलली मराठीत…Video

मुंबई – मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये सर्वांना खळखळू हसवणाऱ्या सिद्धार्थ जाधवचा ‘बालभारती’ नावाचा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्याच प्रमोशनमध्ये सिद्धू सध्या खूप व्यस्त आहे. यावेळी सिद्धूने थेट बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनला फर्नांडिसला मराठीत बोलायला लावून प्रमोशन करून घेतल्याचे दिसून आले. सिद्धूसाठी मराठीत बोलणाऱ्या जॅकलिनचा व्हिडीओ खूपच मजेशीर वाटत आहे.
“नमस्कार मी जॅकलिन, सिद्धूची मराठी फिल्म येतीय ‘बालभारती’ नक्की पहा आणि आमचा सर्कसचा ट्रेलर देखील येतोय नक्की पहा… सिद्धू ऑल द बेस्ट” असं जॅकलिन या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. यासोबतच जॅकलिनचा एक्सेन्ट आणि मराठी ऐकून अनेकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.
View this post on Instagram
जॅकलिन सिद्धार्थाच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने सिद्धू काहीही करू शकतो असं म्हटलंय तर दुसऱ्याने आता बालभारती पाहावाच लागेल अशी कमेंट केली आहे. जॅकलिन आणि सिद्धार्थ जाधव रोहित शेट्टीच्या आगामी सर्कस या चित्रपटात देखील दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहे. लवकरच याही चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.





