मराठी सिनेसृष्टीत अनेक दर्जेदार आणि आशयघन असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशा प्रकारच्या आशयघन चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या अनेक निर्मिती कंपन्या आहेत, त्यातलीच एक झी स्टुडिओ कंपनी आहे. या निर्मिती संस्थेचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच झी गौरव या पुरस्कार सोहळ्यात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे नाव आता थांबायचं नाय असे असून महाराष्ट्राचे फेव्हरेट जोडी या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता भरत जाधव सिद्धार्थ जाधव या चित्रपटात पुन्हा एकदा आपल्या अभियाची जुगलबंदी करताना दिसणार आहेत. भरत आणि सिद्धार्थ यांची जोडी अनेक दिवसांनंतर या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. चित्रपटाचा विषय शिक्षण क्षेत्रावर आधारित असल्याचे सांगण्यात आले असून अनेक कलाकार चित्रपटात पहायला मिळाणार आहेत. 1 मे रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केले आहे. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया निर्माते आहेत. झी गौरव सोहळ्यात आता थांबायच नाय या चित्रपटाच्या फर्स्ट लूक रिलीज वेळी एक गाणं ऐकू येते. या गाण्याला अजय गोगावले यांचा आवाज लाभला आहे. यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकात निर्माण झाली आहे.