नव्या वर्षात अनेकजण नवा संकल्प करीत असतात. तर काहीजण नवा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असतात. नव्या वर्षाचं सेलिब्रेशन सिलेब्रेटी मंडळीनीही जोरात केलं. त्यांनी न्यू इअरचं सेलब्रेशन केल्याच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर त्यांच्या चाहत्यांना न्यू इअरच्या शुभेच्छा दिल्या. मराठी इंडस्ट्रमधील एका अभिनेत्याच्या पत्नी नव्या वर्षात स्वःताच नवा व्यवसाय सुरू करीत असल्याची माहिती दिली. अभिनेता सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती जाधवने डिसेंबर २०२४ मध्ये महिन्यात सोशल मीडियावर ‘Something New Coming’ अशी पोस्ट करून नवा व्यवसाय करणार असल्याचे सांगितले होते. तृप्तीने तिच्या व्यवसायाची खास पहिली झलक सर्वांना दाखवली आहे. तृप्तीने अलिबागमध्ये सुंदर असा होमस्टे हा नवा व्यवसाय सुरू केला असून, ‘तृप्ती कॅाटेज’ असे या ३ बीएचके व्हिलाचं नाव आहे. तृप्तीने अतिशय सुंदर पद्धतीने डिझाईन केला आहे. यावर सिद्धार्थ जाधवनेही पत्नी तृप्तीचे कौतुक करीत एक पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थने त्या पोस्टमध्ये “अभिनंदन तृप्ती… आज तुझं स्वप्न पूर्ण झालं आहे. तुझं स्वप्न सत्यात उतरलं यासाठी मी खूप आनंदी आहे. गॉड ब्लेस यू” सिद्धार्थने या पोस्टवर ‘तृप्ती कॉटेज’ आणि ‘पिवळा बंगला’ असे हॅशटॅग्ज वापरले आहेत. तृप्ती जाधव या गेल्या काही वर्षांपासून स्वइरा या त्यांच्या कपड्यांचा ब्रँन्ड चालवतात. यानंतर आता तृप्ती यांनी आणखी एका क्षेत्रात पाऊल ठेवत ‘तृप्ती कॅाटेज’ हा नवा व्यवसाय सुरू केला आहे.