Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्राच्या पायाला दुखापत; फोटो शेअर करत दिली माहिती
Sidharth Malhotra : अंबानी कुटुंबाच्या एका कार्यक्रमात सहभागी होत सिद्धार्थने सांगितले दुखापतीमागचे कारण

Sidharth Malhotra: बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ‘द वान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या चित्रपटात दिसणार आहे. मात्र एकीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच एक वृत्त समोर आले आहे. सिद्धार्थच्या पायाला दुखापत झाली आहे. (Sidharth Malhotra)
सिद्धार्थने नुकताच सोशल मीडियावर त्याच्या दुखापत झालेल्या पायाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या दुखापत झालेल्या पायाला वॉकिंग बूट लावल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्याने मजेशीर कॅप्शनही दिलं. “ब्रेक अ लेग ही म्हण मी जरा जास्तच मनावर घेतली”, अशी कॅप्शनही त्याने दिले आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थने या पोस्टमध्ये त्याच्या पायाला नेमकी कशी दुखापत झाली याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, नुकताच अंबानी कुटुंबाचा एक कार्यक्रम जामनगरमध्ये पार पडला. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ त्याच्या पायाला कशी दुखापत झाली याबद्दल सांगताना दिसत आहे. (Sidharth Malhotra)
सिद्धार्थ म्हणाला, “मला तुमच्याबरोबर डान्स करायचा होता, गाणी गायची होती आणि उड्या मारायच्या होत्या. पण, काही वेळापूर्वी मी माझ्या परफॉर्मन्सची तयारी करत होतो त्यावेळी उत्साहात मी जरा जास्तच उड्या मारल्या, त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली आणि मला दवाखान्यात जावं लागलं.” यात त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे दुखापत झाली हे सांगितले आहे. ( Sidharth Malhotra)
दरम्यान, लवकरच सिद्धार्थ आणि कियारा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. अलीकडेच कियाराने एक फोटो शेअर केला होता. ज्यात कियारा आणि सिद्धार्थचा हात एकमेकांच्या हातात असून त्यांची मुलगी सरायाने सुद्धा दोघांच्या हातात तिचा हात ठेवला आहे. या तिघांसोबत इवलेसे पायमोजे दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन सिद्धार्थ-कियाराने ही गुड न्यूज सर्वांना दिली. (Sidharth Malhotra)
हेही वाचा:





