बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या लूक आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतो. सिद्धार्थची फॅन फॉलोइंगही चांगली आहे. चाहते त्याच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. अशात आता त्याच्या आगामी चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि एकता कपूर यांनी एका फीचर फिल्मसाठी हातमिळवणी केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पंचायत या वेब सीरिजचे निर्माते दीपक मिश्रा करणार आहेत. चित्रपटाचा आशय अतिशय उत्कृष्ट आहे. तसेच, हा हिंदू पौराणिक कथांवर आधारित नाटक आणि भावनांनी भरलेला चित्रपट असणार आहे. एकता कपूर आणि TVF ने मोठ्या पडद्यावर अनोख्या पण व्यावसायिक कथा आणण्यासाठी भागीदारी केली आहे. अशात हा चित्रपट बालाजी आणि टीव्हीएफ यांच्यातील कराराचा एक भाग आहे. एकता कपूरच्या चित्रपटावर काम सुरू करण्यापूर्वी, सिद्धार्थ मल्होत्रा नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या दिनेश विजानच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. याशिवाय तो सैफ अली खानसोबत ‘रेस 4’मध्येही दिसणार आहे. सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा ‘रेस 4’ मध्ये एकमेकांशी स्पर्धा करताना दिसणार आहेत. दरम्यान, सिद्धार्थ, दीपक मिश्रा आणि एकता कपूर यांच्या या चित्रपटाबाबत आणखी काय माहिती समोर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकता हे बॉलिवूड चित्रपट आणि हिंदी मालिकांमधील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने टीव्ही मालिकांसह अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘क्या कूल हैं हम’, ‘लव्ह सेक्स और धोका’, ‘रागिनी एमएमएस’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ यासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.