सिद्धार्थ-जान्हवीच्या ‘परम सुंदरी’ सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली

Param Sundari | अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री जान्हवी कपूर एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘परम सुंदरी’ या चित्रपटात त्यांची जोडी पाहायला मिळणार असल्याने चाहतेही उत्सुक आहेत. मात्र या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखच पुढे ढकलण्यात आली आहे.
जेव्हा चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता, तेव्हा चित्रपटाची रिलीज डेट 25 जुलै सांगितली गेली होती. पण आता हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज केला जाणार असल्याचे समोर आले आहे.
राजकुमार रावचा ‘मालिक’ सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमावेळी थिएटरमध्ये ‘परम सुंदरी’चा टीझर दाखवण्यात आला. त्यात नवीन रिलीज डेट समोर आली. सिनेमा ऑगस्ट महिन्यात येत आहे हे त्यातून स्पष्ट झालं. रिलीज डेट पुढे नेण्याबद्दल अद्याप मेकर्सने अधिकृत घोषणा केलेली नाही.
२५ जुलै रोजी अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार २’ रिलीज होणार आहे. त्यामुळेच ‘परम सुंदरी’ पुढे ढकलला असल्याची चर्चा आहे. मात्र, चित्रपटाची नवीन रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
‘परम सुंदरी’चा टीझर मे महिन्यात रिलीज करण्यात आला होता. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राला उत्तर भारतातील मुलगा परम आणि जान्हवी कपूरला दक्षिण भारतातील मुलगी सुंदरीच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. टीझरमध्ये चित्रपटाची रिलीज डेट 25 जुलै सांगितली गेली होती. मात्र आता हा चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा :
सिगारेटप्रमाणे ‘समोसा, जिलेबी आणि लाडू’ आरोग्यासाठी धोकादायक ; आरोग्य मंत्रालयाकडून अलर्ट जारी





