‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाच्या यशानंतर सिद्धार्थ जाधवची भावूक पोस्ट

Siddharth Jadhav | मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘आता थांबायचं नाय‘ हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. ‘आता थांबायचं नाय’ हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट जो 50 दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहिला. यात मुख्य भूमिकेत भरत जाधव देखील पाहायला मिळाले.
सिद्धार्थ जाधव चित्रपटाच्या यशावर म्हणाला की, “रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करतोय. सुमित राघवन, दिलीप रावळकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले. असं वाटलं जणू सगळं मराठी अभिनय सृष्टीचं कुटुंबच जवळ आलं. 25 दिवस, मग 50 दिवस… आणि ते तुफान हाऊसफुल शोज. ती आठवण माझ्या कायम लक्षात राहील. हा सिनेमा नाही, ही आठवण आहे आणि ती कायम माझ्या हृदयात राहील…”
‘आता थांबायचं नाय’ चित्रपटात सिद्धार्थ जाधवने मारुती कदम हे पात्र साकारले होते. जे त्याच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक बाप जो परिस्थितीने हरवलेला आणि मुलीसाठी लढणारा…सिद्धार्थ कॉमेडी भूमिकांमधून या चित्रपटात संवेदनशील पात्रात पाहायला मिळत आहे. Siddharth Jadhav |
View this post on Instagram
‘आता थांबायचं नाय’ घरबसल्या पाहायला मिळणार
‘आता थांबायचं नाय’ चित्रपट थिएटर गाजवल्यावर आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे. 27 जुलै दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता चित्रपट झी टॉकीजवर पाहता येणार आहे. Siddharth Jadhav |
हा चित्रपट 1 मे रोजी थिएटर्समध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केले आहे. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया निर्माते आहेत. Siddharth Jadhav |
हेही वाचा:





