‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात झळकणार सिद्धार्थ जाधव

Siddharth Jadhav | ‘नवरा माझा नवसाचा’ हा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. यानंतर आता या चित्रपटाचा दूसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. या सिनेमात लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवची एन्ट्री झाली आहे.
सिद्धार्थने नुकतेच ‘नवरा माझा नवसाचा २’ सिनेमाचं डबिंग पूर्ण केले. याशिवाय सचिन पिळगावकरांसोबत खास फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे या चित्रपटात कॉमेडीचा डबल धमाका पहायला मिळणार आहे. सिद्धार्थच्या या पोस्टनंतर प्रेक्षकांची देखील उत्सुकता अधिक वाढली आहे. Siddharth Jadhav |
View this post on Instagram
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील सचिन पिळगावकर करणार आहेत. दुसऱ्या भागात अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर, निर्मिती सावंत, संतोष पवार अशी दिग्गज कलाकार असणार आहेत.
तर 2004 साली रिलीज झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर हे कलाकार होते. या चित्रपटाच्या यशानंतर लवकरच दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. Siddharth Jadhav |
हेही वाचा :
मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या विवाहसोहळ्याला कार्तिक आर्यनची हजेरी





