मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या विवाहसोहळ्याला कार्तिक आर्यनची हजेरी

Kartik Aaryan| अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा लग्नसोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर दिग्दर्शक समीर विद्वांसनेही जुईली सोनाळकरसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्यात अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या लग्नसमारंभासाठी अभिनेता कार्तिक आर्यन देखील उपस्थिती राहीला होता.
कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर समीर विद्वांसच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत “यांच्या लव्हस्टोरी सत्यप्रेम की कथा या सिनेमाच्या सेटवर आम्ही खुलताना पाहिली आहे. तुमच्या या सुंदर प्रवासाचा भाग असल्याचा मला आनंद आहे. समीर विद्वांस सर आणि जुईली तुमचं अभिनंदन”, असं कार्तिकने पोस्टमध्ये म्हटले आहे.
कार्तिकच्या या पोस्टवर समीर विद्वांसने कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत. सध्या समीर आणि जुईलीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, समीर विद्वांसने ‘सत्यप्रेम की कथा’ या बॉलिवूड सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होते. Kartik Aaryan|
Instagram पर यह पोस्ट देखें
समीरने ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘व्हाय झेड’, ‘धुरळा’, ‘टाइम प्लीज’, ‘डबल सीट’, ‘आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमांचं दिग्दर्शन केले आहे. कार्तिकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलिकडेच कार्तिकचा ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ओथे यश मिळाले आहे. त्यानंतर लवकरच कार्तिक ‘भूल भुलैया 3’ मध्ये दिसणार आहे.
Kartik Aaryan|
हेही वाचा:
‘VD 12’ चित्रपटात विजय देवरकोंडा – भाग्यश्री बोरसे दिसणार एकत्र





