nagar | पेंटर आॅफिसरपदी सिद्धार्थ चव्हाण

शेवगाव, (प्रतिनिधी) – भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय स्पर्धा परीक्षामध्ये शेवगाव येथील सिद्धार्थ किसन चव्हाण यांची वाणिज्य व उद्योग मंत्रालयामध्ये पेटंट ऑफिसर (क्लास वन राजपात्रित अधिकारी) म्हणून निवड झाली आहे.
देशस्तरावर पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि नंतर तोंडी मुलाखत होऊन अंतिम निवड झाली आहे . याअगोदर सिद्धार्थ यांची महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये देखील नगरपालिका संगणक अभियंता अ श्रेणी पदी निवड झालेली आहे .
सिद्धार्थ यांचे शालेय शिक्षण शेवगाव येथील रेसिडेन्सीयल हायस्कूलमध्ये झाले असून पुणे येथील सीओइपी अभियांत्रिकी महाविद्यालयातू ते कॉम्पुटर इंजिनियर झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा वडुले खुर्दच्या श्री संत वामनभाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा . किसन चव्हाण यांचे चिरंजीव आहेत. या निवडीमुळे सर्व स्तंरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.





