Palak Tiwari | Shweta Tiwari | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारीने अनेक मालिका आणि शोमध्ये काम केले आहे. श्वेता तिवारी नेहमीच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली आहे. वयाच्या चाळीशीनंतर देखील तिने स्वत:ला फिट ठेवले आहे. तिच्या फिटनेसचे आणि सौंदर्याचे अनेकांकडून कौतुक केले जाते. श्वेता तिवारीचे पहिल्यांदा १९९८ साली राजा चौधरीसोबत लग्न झाले होते. अभिनेत्रीला राजापासून एक मुलगी आहे, तिचे नाव ‘पलक तिवारी’ आहे. पलकने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान ‘या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी दुसरे लग्न केले दोघांना एक मुलगा असून ती अभिनवपासूनही विभक्त झाली आहे. सध्या अभिनेत्री आपल्या मुलांसोबत राहते. श्वेता तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित छोटे-छोटे क्षणही सर्वांसोबत शेअर करते. दोन घटस्फोटांनंतर, श्वेता तिवारी आता तिच्या मुलांवर आणि तिच्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसते. ती जीवनही मोकळेपणाने जगते. श्वेता तिवारी अनेकदा तिच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते. नुकतंच अभिनेत्री आपल्या लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. पलक तिवारीचा नवीन चित्रपट ‘भूतनी’ येत आहे. हा चित्रपट १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा पलकचा दुसरा चित्रपट असणार आहे. पलक तिवारीला ‘भूतनी’ चित्रपटासाठी शुभेच्छा देताना, आई श्वेता तिवारीने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘भूतनी’चे पोस्टर शेअर करताना श्वेताने लिहिले, ‘माझी प्रिय अनन्या.’ पोस्टमध्ये त्यांची मुलगी पलक दिसत आहे. पलक तिवारीचा पहिला चित्रपट सलमान खानसोबत होता. तो ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसला होता. मात्र, हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता अभिनेत्री ‘भूतनी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पलक सोशल मीडियावर सक्रिय असून तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त मोठी आहे. इंस्टाग्रामवर तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे. ती तिच्या स्टाईलने, ड्रेसिंग सेन्सने आणि लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अभिनेत्री इंस्टग्रामवर नेहमीच स्वतःचे बोल्ड लूक मधील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. तिचा हा हॉट अंदाज फॅन्सला देखील खुपच आवडतो.