Shweta Mahale : आमदार श्वेता महाले यांनी साजरी केली साधेपणाने भाऊबीज; मतदारसंघातील बांधवांचे केले औक्षण
Shweta Mahale : 'दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा सण साजरा करण्यात आला'

Shweta Mahale : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी आज चिखली येथील आपल्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी केली.
राज्यातील आणि मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणताही थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने हा सण साजरा करण्यात आला, अशी माहिती आमदार श्वेता महाले यांनी दिली.
यावेळी मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. आमदार श्वेता महाले यांनी उपस्थित सर्व भावांचे औक्षण करून त्यांना उदंड आयुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. Shweta Mahale
Tukaram Mundhe : ‘चलता है’ असे धोरण सोडा; खाद्यपदार्थांच्या निकृष्ट दर्जावरुन तुकाराम मुंडेंचे आवाहन





