IND vs WI : जैस्वालने जोरदार धडक झाल्यानंतर गिलची घेतली फिरकी, VIDEO होतोय व्हायरल

कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून गिलला प्रथमच नाणेफेक जिंकण्यात यश मिळाले. भारताने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 38 धावांवर बाद झाला. त्यानंतर जैस्वाल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 193 धावांची दमदार भागीदारी रचली. जैस्वालने शानदार शतक झळकावले, तर सुदर्शन पहिले कसोटी शतक झळकावण्यापासून 13 धावा दूर राहिला.
गिल आणि इमलॅच यांच्यात झाली जोरदार धडक –
Shubman Gill collided with Tevin Imlach 😨 pic.twitter.com/c9m4yOSe55
— Richard Kettleborough (@RichKettle07) October 10, 2025
सुदर्शन बाद झाल्यानंतर कर्णधार गिल मैदानात उतरला. 85व्या षटकात अँडरसन फिलिपच्या गोलंदाजीवर जैस्वालने मिडविकेटच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षकाने चेंडू त्वरित यष्टिरक्षकाकडे फेकला, तेव्हा गिल आणि वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक टेविन इमलॅच यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दोघेही खाली पडले. यामुळे फिजिओला मैदानावर यावे लागले.
हेही वाचा – IPL 2026 चा बिगुल वाजला, १५ नोव्हेंबरपर्यंत संघांना सादर करावी लागेल रिटेंशन यादी; लिलावाची तारीखही ठरली
व्हिडीओ होतोय व्हायरल –
After the collision
Dr. Jaisu asking Shubman “ye kitne fingers hai” 😂🤍
Cuties doing cute things!🫶🏻 pic.twitter.com/bXxNfgYJAI— 🐚 (@77gilluboy) October 10, 2025
त्यामुळे सामना काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला. दरम्यान, जैस्वाल गिलची फिरकी घेताना दिसला. तो गिल बोटं दाखवताना दिसला. हा मजेदार क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय संघ पहिल्या दिवसअखेर मजबूत स्थिती आहे, आणि जैस्वाल-गिल जोडी उद्या दुसऱ्या दिवशीही आक्रमक खेळ सुरू ठेवण्यास उत्सुक आहे.





