RCB vs GT : आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर शुबमन गिलने बहिणीचा घेतला बदला? पोस्ट होतेय व्हायरल

RCB vs GT Shubman Gill taken sister Shahneel Gill revenge : आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुजरात टायटन्सकडून हंगामातील पहिला पराभव पत्करावा लागला. बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करत १६९ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात गुजरातने केवळ २ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. बंगळुरूच्या पराभवानंतर, शुबमन गिल सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे आणि याचे कारण म्हणजे त्याचे ट्विट, ज्यामुळे विराट कोहली आणि आरसीबी चाहते नाराज झाले आहेत. काही चाहत्यांच्या मते शुबमन गिलने हे ट्विट करुन त्याची बहीण शहनील गिलचा बदला घेतला आहे.
शुबमन गिलच्या ट्विटचा अर्थ काय?
सामना संपताच शुबमन गिलने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली, त्यानंतर सोशल मीडियावर वादळ उठले आहे. शुबमन गिलने त्याच्या पोस्टमध्ये हे ७ शब्द लिहिले की, “खेळाकडे लक्ष द्या, गोंगाटाकडे नाही,” प्रश्न असा आहे की, हे ट्विट आरसीबीच्या उत्साही चाहत्यांसाठी होते, जे सामन्यादरम्यान सतत गोंगाट करत होते? की गिल बाद झाल्यावर विराट कोहलीने केलेल्या सेलिब्रेशनसाठी. शुबमनच्या ट्विटवर चाहत्यांनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘जेव्हा भुवनेश्वर कुमारने गिल बाद केला, तेव्हा विराटने सर्वात जास्त सेलिब्रेशन केले होते.
Was this needed from a player like you ?
Have anyone mocked you ? Did crowd booed you or your team ?
The crowd was just behind their team and we will forever do that .
I like you as a batsman but today you lose some respect from my side @ShubmanGill
— Suraj (@SunitaK97720452) April 2, 2025
ही पोस्ट त्या लोकांसाठी होती का ज्यांनी बहिणीला ट्रोल केले?
https://twitter.com/BelgianWaffle/status/1907508327938142543
दुसरीकडे, काही लोकांना आठवले की आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर गिलची बहीण शहनीलला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. प्रश्न असा आहे की, गिलची ही पोस्ट त्या ट्रोलर्सना उत्तर होती का? काहीही असो, एक गोष्ट स्पष्ट होती की कधीकधी सोशल मीडियावरील वादविवाद क्रिकेटच्या मैदानापेक्षा जास्त मनोरंजक असतात आणि गिलच्या या सात शब्दांनी आगीत तेल ओतले. विराट कोहलीचे चाहते शुबमन गिलला जोरदार शिव्या देत आहेत. बरं, आता गुजरात आणि आरसीबी यांच्यात कोणताही लीग सामना नाहीये पण जर दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले तर आपण पुन्हा एकदा सामना पाहू शकतो.
हेही वाचा – RCB vs GT : “कौण है ये लोग और कहां से आते है…”, विराटला आऊट केल्यानंतर अर्शद खान ऐवजी अर्शद वारसी ट्रोल
सामन्यात गुजरातने आरसीबीवर केली मात –
या सामन्याबद्दल बोलायचे, तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या. संघाकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक ५४ धावा केल्या. त्याच्याशिवाय जितेश शर्माने ३३ धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच आरसीबी संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला. यानंतर, गुजरातकडून साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी चांगली फलंदाजी केली. सुदर्शनने ४९ धावा आणि बटलरने ७३ धावा करत गुजरात संघाला ८ विकेट्सने विजय मिळवून दिला.





