Shubman Gill : शुबमन गिलचा शतकी धमाका! रोहितचा विक्रम मोडत WTC मध्ये रचला इतिहास

Shubman Gill Records in IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिल ने शानदार शतकी खेळी साकारत वेस्टइंडीजच्या गोलंदाजांना नाकीनऊ आणले. त्याच्या स्फूर्तिदायी आणि सावध खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 518 धावांचा डोंगर उभा करून पारी घोषित केली. गिलने 129 धावांची खणखणीत खेळी केली, तर यशस्वी जैस्वालने 175 धावांचा डोंगर रचला. साई सुदर्शनने 87 धावांचे योगदान दिले. दरम्यान कर्णधार गिलने शतक झळकावत अनेक विक्रम मोडले.
शुबमन गिलने मोडला रोहित शर्माचा विक्रम –
शुबमन गिलने या सामन्यातील शतकासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडला असून, डब्ल्यूटीसीमध्ये गिलचे हे 10 वे शतक आहे. रोहितने यापूर्वी 9 शतके ठोकली होती. गिल हा डब्ल्यूटीसीमध्ये 10 शतके ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
कर्णधार म्हणूनही गिलने रचला इतिहास –
𝙄.𝘾.𝙔.𝙈.𝙄
1️⃣2️⃣9️⃣* Runs
1⃣9️⃣6️⃣ Balls
1️⃣6️⃣ Fours
2️⃣ Sixes👇 Relive #TeamIndia captain Shubman Gill’s 🔟th Test Century 💯#INDvWI | @IDFCFIRSTBank | @ShubmanGill
— BCCI (@BCCI) October 11, 2025
शुबमन गिलने डब्ल्यूटीसीमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याचा भारतीय विक्रमही आपल्या नावावर केला आहे. त्याने या सामन्यातील शतकासह रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांना मागे टाकले. गिलचे कर्णधार म्हणून डब्ल्यूटीसीमधील हे पाचवे शतक आहे, तर रोहित आणि बाबर यांनी प्रत्येकी चार शतके ठोकली आहेत.
हेही वाचा – IND vs WI : दिल्लीत यशस्वीचा जलवा, संयमी फलंदाजीने शतक ठोकत विराटच्या खास विक्रमाला दिली टक्कर!
डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे कर्णधार:
- जो रूट (इंग्लंड) – 8 शतके
- दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका) – 6 शतके
- शुबमन गिल (भारत) – 5 शतके
- रोहित शर्मा (भारत) – 4 शतके
- बाबर आझम (पाकिस्तान) – 4 शतके
हेही वाचा – Mohsin Naqvi : आशिया कप ट्रॉफीचा वाद तीव्र; मोहसिन नक्वींविरुद्ध बीसीसीआयची बंदीची मागणी!
भारत पहिल्या डावात भक्कम स्थितीत –
भारतीय संघाने पहिल्या डावात शानदार फलंदाजी करत 518 धावांचा मजबूत पाया रचला. यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 175 धावांची खेळी केली, तर शुबमन गिलने 129 धावा काढल्या. साई सुदर्शनने 87 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. नितीश कुमार रेड्डी (43) आणि ध्रुव जुरेल (44) यांनीही उपयुक्त खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर दडपण टाकले असून, सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.





