Shubman Gill Comment : “भैय्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी…”, कोहलीच्या लेकावरील रीलवर गिलच्या कमेंटने वेधलं लक्ष, पाहा VIDEO
Shubman Gill Comment : सध्या विराटच्या कुटुंबाशी संबंधित एका मजेशीर व्हिडिओने धुमाकूळ घातला असून त्यावरील शुबमन गिलच्या कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे.

Shubman Gill Hilarious Comment On Virat Kohli Son Akaay Viral School Video : भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला, तरी त्याच्या नावाची चर्चा नेहमीच रंगलेली असते. सध्या क्रिकेट चाहते आणि इन्फ्लुएन्सर्स यांच्यात विराटच्या कुटुंबाशी संबंधित एका मजेशीर व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे खरे कारण विराट नव्हे, तर त्याचा लाडका मुलगा अकाय (Akaay) आणि युवा स्टार फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) ठरले आहेत. गिलच्या एका मजेशीर कमेंटने या व्हिडिओला इंटरनेटवर प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
शिक्षिका म्हणाली, “पालकांसोबत काका शुबमन गिललाही शाळेत घेऊन ये!”
इन्स्टाग्रामवर एका कंटेंट क्रिएटरने शाळेतील शिक्षिकेची भूमिका साकारत एक विनोदी रील पोस्ट केली आहे. यामध्ये ती शिक्षिका विराटचा मुलगा अकायला खोडकरपणा केल्याबद्दल दम भरताना दिसते. “उद्या शाळेत येताना आई-वडिलांना म्हणजेच विराट आणि अनुष्का शर्माला सोबत घेऊन ये,” असे ती त्याला सांगते. पण व्हिडिओचा खरा ट्विस्ट पुढे येतो, जेव्हा ती शिक्षिका लाजत लाजत पुढे म्हणते, “आणि येताना तुझ्या त्या शुबमन गिल काकालाही सोबत घेऊन ये!”
शुबमन गिलने घेतली फिरकी; विराटला टॅग करत म्हणाला…
Will Kohli reply to Gill or not? 😹😹 pic.twitter.com/BzMeBq0w9g
— Shivani (@meme_ki_diwani) September 3, 2026
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि योगायोगाने शुबमन गिलच्या नजरेस पडला. गिलनेही संधी न गमावता या व्हिडिओवर अत्यंत मिश्कील कमेंट केली. त्याने थेट विराट कोहलीला टॅग करत लिहिले, “भैय्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका… मी तुमच्या जागी सगळं सांभाळून घेईन.” गिलच्या या हजरजबाबी उत्तराने नेटकऱ्यांना लोटपोट हसायला लावले.
व्हिडीओ तुफान व्हायरल; चाहत्यांना आता विराटच्या उत्तराची प्रतीक्षा!
He ain’t gonna reply Gill bro 😭 pic.twitter.com/rJsNktEJ6l
— Sohel. (@SohelVkf) September 3, 2026
शुबमन गिलच्या या भन्नाट कमेंटनंतर हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून ‘एक्स’वर (ट्विटर) वेगाने व्हायरल झाला आहे. चाहत्यांमध्ये आता यावर जोरदार चर्चा सुरू झाली असून प्रत्येकाला उत्सुकता आहे की विराट कोहली यावर काय प्रतिक्रिया देईल. सोशल मीडियापासून अंतर ठेवणाऱ्या कोहलीकडून उत्तराची शक्यता कमी असली, तरी गिलच्या या मजेशीर ‘काका’ अवताराने चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत.





