IND vs ENG : शुबमन गिलने मोडला विराटचा विक्रम, सेना देशांमध्ये हा पराक्रम करणारा पहिलाच आशियाई फलंदाज

गिलने मोडला विराटचा विक्रम –
शुबमन गिलने सेना देशांमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आशियाई फलंदाजाचा विक्रम मोडला. त्याने ७४ धावा करताच विराट कोहलीच्या ६९२ धावांच्या विक्रमाला मागे टाकले. आज, पाचव्या दिवशी, गिलने स्टोक्सच्या चेंडूवर दोन धावा घेत ६५व्या षटकात या मालिकेत ७०० धावांचा टप्पा पूर्ण केला. अशा प्रकारे, तो सेना देशांमध्ये ७०० धावा करणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे.
A fine fifty-run partnership comes up between Captain Shubman Gill & KL Rahul 🤜🤛#TeamIndia 50/2, trail by 261 runs
Updates ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#ENGvIND pic.twitter.com/UikxGXkfqa
— BCCI (@BCCI) July 26, 2025
गिलने गावस्करांच्या विक्रमाची केली बरोबरी –
शुबमन गिलने दिग्गज सुनील गावस्कर यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. गावस्कर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर ७७४ धावा केल्या होत्या, तर १९७९ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्यांनी ७३२ धावा केल्या होत्या. आता गिलने या मालिकेत ७००* धावा करून हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. एकूण विक्रमांबद्दल बोलायचे झाले, तर गिल कसोटी मालिकेत ७०० धावा करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. यशस्वी जायसवालने २०२४ मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर ७१२ धावा केल्या होत्या.
गिलने मोडले अनेक विक्रम –
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गिलला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. गिलने या संधीचा पुरेपूर फायदा घेत चमकदार कामगिरी करत निवड समितीचा निर्णय योग्य ठरवला. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. गिल इंग्लंडमधील एका कसोटी मालिकेत ७०० हून अधिक धावा करणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. याशिवाय, ७०० हून अधिक धावा करणारा तो दुसरा भारतीय कसोटी कर्णधार बनला. गिलने आणखी एक पराक्रम केला आहे. परदेश दौऱ्यावर इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत ७०० धावा करणारा तो तिसरा कर्णधार ठरला.





