IND vs PAK : अभिषेक-शुबमनशी पंगा घेणे आफ्रिदीला पडले महागात, दोन्ही फलंदाजांनी केली चांगलीच धुलाई, पाहा VIDEO

IND vs PAK Abhishek Shubman fight with Afridi : भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान शुभमन गिल आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात जोरदार वाद झाला, परंतु अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला चोख प्रत्युत्तर दिले. या दोन्ही मित्रांनी मिळून शाहीन आफ्रिदीचा अहंकार खाली आणला. गोलंदाजाने फक्त जोरदार हल्ला केला, परंतु शुभमन गिलने चौकार आणि अभिषेक शर्माने षटकार मारले. काय झाले ते जाणून घेऊया.
शाहीनच्या पहिल्या चेंडूवर अभिषेकचा षटकार
क्रीझवर येताच अभिषेक शर्माने शाहीन आफ्रीदीच्या पहिल्याच चेंडूवर दमदार षटकार ठोकला. शाहीनने बाऊन्सर टाकण्याचा प्रयत्न केला, पण डावखुऱ्या अभिषेकने अप्रतिम पुल शॉट खेळत चेंडू सीमारेषेपार पाठवला. शाहीनला पहिल्या षटकात विकेट घेण्यासाठी ओळखले जाते, पण अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त्याला चकित केले. ज्यामुळे तोअभिषेकला काहीतर बोलला. त्याला प्रत्युत्तर देताान म्हणाला, ‘जा-जा बाॉल टाक.’
Shubman Gill 🔥after smoking Shaheen for 4:
Shot bhi lagaya, izzat bhi utari’ 🤡🔥”Abhishek Sharma | Shivam dube | #PAKvIND #PakistanCricket pic.twitter.com/Tx3vqfwK2x
— Harsh Vardhan (@harshvard100710) September 21, 2025
गिलनेही दिले चोख प्रत्युत्तर –
Classic Abhishek Sharma 💥
Watch #INDvPAK LIVE NOW, on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/hORYGOrpgS
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 21, 2025
अभिषेकच्या षटकाराने बिथरलेल्या शाहीनने पुढील षटकात शुभमन गिलवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण गिलने शाहीनच्या चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर सलग चौकार ठोकले. यामुळे चिडलेल्या शाहीनने गिलला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण गिलने शांतपणे बाऊंड्रीकडे बोट दाखवत आपली कामगिरी बोलकी केली. विशेष म्हणजे, गिलचा हा इशारा १९९६ मध्ये आमिर सोहेलने वेंकटेश प्रसादला केलेल्या इशाऱ्याची आठवण करणारा होता.
हेही वाचा – IND vs PAK : दोन जीवनदान, अर्धशतक, अन् फायरिंग सेलिब्रेशन साहिबजादाला शिवमने दाखवला तंबूचा रस्ता! पाहा VIDEO
गिल-शर्माने पाकच्या गोलंदाजांची केली धुलाई
शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पॉवरप्लेमध्ये या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत अवघ्या २८ चेंडूंमध्ये भारताचा स्कोअर ५० च्या पुढे नेला. या दरम्यान अभिषेक शर्माने एक मोठा विक्रमही नोंदवला. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये ५० षटकार ठोकण्याचा विक्रम केला. अभिषेकने फक्त ३३१ चेंडूंमध्ये हा पराक्रम केला, ज्याने त्याने वेस्ट इंडिजच्या एविन लुईसचा विक्रम मोडला. याआधी भारताकडून सूर्यकुमार यादवने ५१० चेंडूंमध्ये हा विक्रम केला होता.





