पुन्हा पुढे ढकलली शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम ; समोर आले ‘हे’ मोठे कारण

Shubhanshu Shukla Space Mission। भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे अॅक्सिओम-४ मिशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ‘स्टॅटिक फायर’ चाचणीनंतर बूस्टरच्या तपासणीदरम्यान द्रव ऑक्सिजन (LOx) गळती झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मोहिमेला ब्रेक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेअंतर्गत, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना आयएसएसमध्ये पाठवण्यात येणार होते.
स्पेसएक्सने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) नियोजित अॅक्सिओम-४ मिशनचे प्रक्षेपण पुढे ढकलल्याची पुष्टी केली आहे. शुभांशूसह अॅक्सिओम-४ मिशन बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता प्रक्षेपित होणार होते. अॅक्सिओम-४ मिशनमध्ये भारत, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर समाविष्ट आहेत. Shubhanshu Shukla Space Mission।
Standing down from tomorrow’s Falcon 9 launch of Ax-4 to the @Space_Station to allow additional time for SpaceX teams to repair the LOx leak identified during post static fire booster inspections. Once complete – and pending Range availability – we will share a new launch date pic.twitter.com/FwRc8k2Bc0
— SpaceX (@SpaceX) June 11, 2025
स्पेसएक्सने एक्सवर पोस्ट केले की, अॅक्स-४ मिशनसाठी उद्याचे फाल्कन ९ रॉकेटचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात येत आहे जेणेकरून स्पेसएक्स टीम्स एलओएक्स गळती दुरुस्त करू शकतील. कंपनीने पुढे म्हटले आहे की दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आणि रेंज उपलब्धतेनुसार नवीन प्रक्षेपण तारीख शेअर केली जाईल.
शुभंशु शुक्ला यांचे अंतराळ उड्डाण पुढे ढकलण्यात आले, आता अॅक्सिओम-४ मोहीम ११ जून रोजी प्रक्षेपित होणार आहे. यापूर्वी, स्पेसएक्सने एका निवेदनात म्हटले होते की, “प्रक्षेपणासाठी हवामान अनुकूलता ८५ टक्के आहे. मात्र, चढाईच्या कॉरिडॉरमध्ये जोरदार वाऱ्यांचे निरीक्षण केले जात आहे.” Shubhanshu Shukla Space Mission।
हेही वाचा
अग्रलेख: एक पक्ष, दोन मिळावे!





