सत्यजित तांबे यांना शुभांगी पाटील यांचं ओपन चॅलेंज,’अब राजा का बेटा राजी नही बनेगा, काम करेल त्यालाच जनता निवडून देईल’

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची तर औरंगाबाद, नागपूर, कोंकण शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजित तांबे (अपक्ष) यांच्या उमेदवारीवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे.
अशातच उद्धव ठाकरे व निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरलेल्या शुभांगी पाटील यांची मातोश्रीवर भेट झाली. या भेटीनंतर शिवसेनेने (ठाकरे गट) पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तांबे यांच्या अनपेक्षित खेळीमुळे चर्चेत आलेली पदवीधरची निवडणूक आता यामध्ये शिवसेनेने घेतलेल्या एंट्रीमुळे आणखी रंगतदार होणार हे स्पष्ट झालंय. यातच निवडणुकीवरून शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना आव्हान आहे.
माध्यमांशी बोलतांना शुभांगी पाटील म्हणाल्या,’अब राजा का बेटा राजी नही बनेगा… काम करेल त्यालाच जनता निवडून देईल, अशा शब्दात पाटील यांनी तांबे यांना आव्हान दिलंय. नाशिक विधान परिषद पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने त्या निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब झालंय. लवकरच ठाकरे गटाच्या नेत्याकडून याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येईल. निवडणूक अर्ज भरताना मला पक्षाच्या वतीने एबी फॉर्म मिळाला नव्हता. त्यामुळे मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचं शुभांगी पाटील यांनी सांगितल.





