पुणे जिल्हा | उपनिरीक्षकपदी मरकळचे शुभम गोडसे

चिंबळी,(वार्ताहर) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेतलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेत मरकळ येथील शुभम गोडसे यांची पोलीस उपनिरिक्षक म्हणून निवड झाली असल्याने मरकळ गावातील ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार ही करण्यात आला.
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका व कुरुळी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या माजी उपाध्यक्षा विद्यमान संचालिका कमल कड, युवाउद्योेजक भरत कड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. पुढील कार्यास शुभेच्या देण्यात आला.
यावेळी सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य तसेच कर्मचारीवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आई-वडीलांचे स्वप्न आणि माझी जिद्द पूर्ण झाली आता पुढील युपीएससीचीही तयारी सुरू ठेवणार आहे असे शुभम यांनी सांगितले.





