Pune Ganesh Visarjan 2025 | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ९ वाजून २३ मिनिटांनी उत्साहात विसर्जन
Updated On:

Ganesh Visarjan 2025 | पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पुण्याचे पहिले पाच मानाचे गणपतीचे विसर्जन झाले आहे. त्यानंतर आता पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला १२ तास पूर्ण झाले असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे देखील विसर्जन झाले आहे. ९ वाजून २३ मिनिटांनी दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाले आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकी दरम्यान, पारंपारिक ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांची साथ आणि टाळ-झांजांच्या तालात भक्तगण “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते.
जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… पुण्याचा अधिपती दगडूशेठ गणपती… च्या जयघोषात शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी झाला.




