उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर अखेर श्रीकांत शिंदे यांचा खुलासा ; म्हणाले,”महायुतीच्या सरकारचा शपथविधी..”

Shrikant Shinde । राज्यातील महायुतीला विधानसभा निवडणुकीत भरभरून मतं मिळाली असली तरी त्यांच्यात अजून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हेच ठरत नाही. मात्र खाते वाटप आणि मंत्रीपदासाठीच्या नावांची चर्चा मात्र जोरात सुरु आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची माळ ही भाजप नेत्याचाच गळ्यात पडणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. परंतु . उपमुख्यमंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. अखेर या समोर आलेल्या सर्व चर्चवर खुद्द खासदार श्रीकांत शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यासाठी त्यांनी एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्याविषयी केल्या जाणाऱ्या सर्व चर्चांची उत्तरे दिली आहेत.
श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटले ? Shrikant Shinde ।
श्रीकांत शिंदे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत, “महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी होते. त्यांनी त्या ठिकाणी विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. तसेच मी उपमुख्यमंत्री होणार? अशा बातम्या गेली दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत,” असे स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या या पोस्टच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाच्या होणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे…
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) December 2, 2024
पदाबाबतची चर्चा बिनबुडाचे आणि निराधार
लोकसभा निवणुकीनंतर झालेल्या मंत्रिपदाच्या विस्ताराबद्दल बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.”असे महंत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
माध्यमांनाही फटकारले Shrikant Shinde ।
श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये माध्यमांनी दिलेल्या बात्म्याविषयीचा उल्लेख करत माध्यमांनादेखील चांगलेच सुनावले आहे. त्यांनी,” माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो. परंतु बातम्या देताना माध्यमांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये, अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल, ही अपेक्षा” असे म्हणत त्यांनी माध्यमांना चुकीचे वृत्त देण्यापासून रोखले आहे.





