श्रीधर गायकवाड पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवे अध्यक्ष; उपाध्यक्षपदी बिपीनकुमार शहा

मुंबई – पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणेचे जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत सन 2025-26 या वर्षासाठी श्रीधर गायकवाड यांची अध्यक्ष पदी व बिपीनकुमार शहा यांची उपाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.
श्रीधर गायकवाड हे यशस्वी उद्योजक असुन श्रीधर फॅब्रिकेशन या मान्यताप्राप्त कंपनीचे संस्थापक आहेत. ते जंगली महाराज आश्रम कोकमठाणचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. बिपीनकुमार शहा हे प्रतिथयश व्यावसायिक असुन अनेक जैन संस्था, संघटनांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासुन सक्रियपणे काम करीत आहेत.
पुणे पीपल्स को-ऑप. बँक ही महाराष्ट्र राज्यातील मल्टीस्टेट को-ऑप बँकांमधील एक अग्रगण्य बँक असुन 31 मार्च, 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने एकूण व्यवसायाचा 2706 कोटीचा टप्पा पार केला आहे. यामध्ये ठेवी रु.1633 कोटी, कर्जे रु.1073 कोटी चा समावेश आहे.
बँकेची निव्वळ एन.पी.ए.ची टक्केवारी 0% सी.डी. रेशो 65.70%, सीआरएआर 15.59%, निव्वळ नफा रु.17.46 कोटी असल्याची त्याचबरोबर प्रती कर्मचारी व्यवसाय रु.12.08 कोटी असल्याचे तसेच अहवाल वर्षासाठी सभासदांना 15.00% दराने लाभांश दिल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीधर गायकवाड यांनी दिली.
सुरक्षा, पारदर्शी व्यवहार आणि ग्राहकहित ही बँकेची त्रिसूत्री असुन 23 शाखासह बँक गेली सुमारे 74 वर्षांपासुन यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. चालू वर्ष अखेर बँकेचा एकूण व्यवसाय 3,000 कोटी पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे अध्यक्षांनी नमुद केले.





