Pune District : श्री छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक उपाध्यक्षपदी कैलास गावडे

भवानीनगर : श्री छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज साहेबराव जाचक व उपाध्यक्षपदी कैलास रामचंद्र गावडे यांची निवड करण्यात आली.
श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली असून या निवडणुकीमध्ये श्री जय भवानी माता पॅनलला कारखान्याच्या सभासदांनी उच्चांकी मतांनी निवडून दिले. या निवडणुकीनंतर आता कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. या निवडणुकीमध्ये प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे, डॉ. राकेश मेहता, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, सिद्धार्थ जाचक, अण्णा पाटील, सतीश काटे, नवनिर्वाचित संचालक शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपत कदम, विठ्ठल शिंगाडे, प्रशांत दराडे, अजित नरुटे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, सतीश देवकाते, निलेश टिळेकर, अशोक पाटील, मंथन कांबळे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकाळ, तानाजी शिंदे, योगेश पाटील, हे उपस्थित होते. निवडी पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी पवार यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संचालक मंडळांची बैठक पार पडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व सर्व सभासदाचा मी आभारी आहे. फार मोठे यश सभासदांनी दिले आहे. या यशाच योग्य ते चीज करायचे आहे. दिलेला शब्द पाळायचा आहे. सर्व संचालकांच्या वतीने मी शब्द देतो कारखान्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करण्यात करायचे आहे.





