Pimpri : श्री विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे दिंडी प्रमुखांचा सत्कार

तळेगाव दाभाडे : पंढरपूरकडे पायी वारी करणाऱ्या मावळ तालुक्यातील २४ दिंडी प्रमुख व विणेकरांचा श्री विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष व माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली व विश्वस्त बाळकृष्ण आरडे यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
अध्यक्ष संजय भेगडे यांनी श्री विठ्ठल मंदिराचा गौरवशाली इतिहास आणि मंदिराच्या सेवाभावी वाटचालीबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी ह.भ.प. महादू सातकर, उत्तमराव बोडके, काशिनाथ ढोरे, माऊली मराठे, कोंडीबा दिवेकर, महेश सोनपावले यांसारख्या अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत दिंडी परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे यतीन शहा, नित्योपचार समितीचे अध्यक्ष हरिदास वनारसे, कार्याध्यक्ष देवराम महाराज खराटे, उपाध्यक्षा सीमा शेलार,सीमा कुलकर्णी, मुरलीधर ढेकणे, काशिनाथ निंबळे, निवृत्ती फाकटकर,अरविंद पाटील, सोनबा गोपाळे सह तालुक्यातील वारकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत श्याम भेगडे यांनी केले. प्रास्ताविक ह.भ.प. नथुराम महाराज जगताप पाटील यांनी केले. सुत्रसंचालन दिनेश दरेकर व नारायण धामणकर यांनी तर आभार विलास गायकवाड यांनी केले.





