श्रीरामपूरात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्रीरामपूर : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या जागृत देवस्थान हनुमान मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री हनुमान जन्मोत्सव साजारा करण्यात आला. आज, १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
या पवित्र प्रसंगी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी करत महाआरती, अभिषेक आणि हनुमान चालिसा पठणामध्ये सहभाग घेतला. मंदिर परिसर भक्तीमय भजनी रंगला असताना हनुमान जन्मोत्सवानिमित्त पाळण्याची दोरी ओढण्याचा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले, राजश्री ससाणे, संजय फंड, ज्ञानेश्वर मुरकुटे, वंदना मुरकुटे, नीरज मुरकुटे, मणीलाल पोरवाल, सुनील गुप्ता, योगेश गुप्ता, अरुण गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. तर मंदिर परिसरात भक्तीगीते आणि हनुमान चालिसाच्या सामूहिक पठणाने आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला असून, श्री हनुमानाच्या कृपेने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशी प्रार्थना यावेळी भक्तांकडून करण्यात आली.





