Pune News : करमोळी गावात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहात साजरा (Pune News) करण्यात आला. जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला हनुमान मंदिरात रात्रभर भजन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. भजन आणि हरिनामाच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते. सकाळी विधिवत पूजा-अर्चा करून हनुमान जन्मोत्सव (Pune News) साजरा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी गावातील मानाच्या काठ्यांची भव्य मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, लहान मुले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक पार पडल्यावर काठ्या त्यांच्या ठराविक जागी बांधण्यात आल्या. यानंतर चतुर्थीच्या दिवशी गावची ग्रामदैवत काळभैरवनाथ यांची यात्रा भरते. त्या दिवशी या काठ्यांना नैवेद्य दाखवून पुन्हा खाली घेतले जाते, अशी परंपरा आहे. Pune News यानंतर गावकऱ्यांकडून (Pune News) खोबरे, गूळ आणि पैशांची उधळण करण्यात आली. तसेच गावातील लहान मुलांना ग्रामदैवत भैरवनाथ व इतर देवतांचे दर्शन घडवून त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याची प्रथा पार पाडण्यात आली. नंतर महाप्रसादाचा आस्वाद गावातील नागरिकांनी घेतला. या सर्व कार्यक्रमांमुळे करमोळी गावात उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांना चुलीवर स्वयंपाक करावा लागला. त्यामुळे स्वयंपाकासाठी अधिक वेळ व मेहनत लागल्याचे सांगण्यात आले.