Arshdeep Singh Record : वानखेडेवर अर्शदीपच्या नावाचा डंका! रेयान रिकेल्टनची विकेट घेत रचला इतिहास, ठरला पंजाबचा पहिलाच गोलंदाज
Arshdeep Singh Record : या सामन्यात अर्शदीप सिंगने २२ धावा खर्च करत तीन विकेट्स घेतल्या.

Arshdeep Singh 100 IPL Wickets Record : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीत पंजाब किंग्सचा (PBKS) वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील १०० विकेट्स पूर्ण केल्या असून, असा पराक्रम करणारा तो पंजाब किंग्सचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
अर्शदीप सिंगने रचला इतिहास –
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना अर्शदीप सिंगने रेयान रिकेल्टनला बाद करून आयपीएलमधील आपल्या १०० विकेट्सचा टप्पा गाठला. या कामगिरीसह तो आयपीएलच्या इतिहासात १०० हून अधिक विकेट्स घेणारा पाचवा डावखुरा वेगवान गोलंदाज (Left Arm Pacer) ठरला आहे. अर्शदीपने या विक्रमासह दिग्गज भारतीय गोलंदाज आशिष नेहरा आणि झहीर खान यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
Back-to-back breakthroughs 🎯
A century of #TATAIPL wickets 🌟Arshdeep Singh becomes the first @PunjabKingsIPL bowler to reach the milestone 👏
Updates ▶️ https://t.co/Fn2dxJ4zYR#TATAIPL | #KhelBindaas | #MIvPBKS | @arshdeepsinghh pic.twitter.com/ioOXVqbfWX
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026
डावखुऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीपची भरारी –
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये ट्रेंट बोल्ट (१४४ विकेट्स) अव्वल स्थानी आहे. त्यानंतर जयदेव उनाडकट (११४), आशिष नेहरा (१०६) आणि झहीर खान (१०२) यांचा क्रमांक लागतो. अर्शदीप सिंगने आता १०१* विकेट्ससह या क्लबमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पंजाबच्या फ्रँचायझीसाठी आजवर कोणत्याही गोलंदाजाला १०० विकेट्सचा टप्पा ओलांडता आला नव्हता, जो मान अर्शदीपने पटकावला आहे.
पॉवरप्लेमधील विकेटचा ‘दुष्काळ’ संपला –
#MI in 𝗱𝗲𝗲𝗽 trouble 😯
🎥 Arshdeep Singh with 2️⃣ wickets in his second over 👊
Updates ▶️ https://t.co/Fn2dxJ4zYR#TATAIPL | #KhelBindaas | #MIvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/6zPnONpClJ
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026
अर्शदीपसाठी हे १०० विकेट्सचे यश जितके महत्त्वाचे आहे, तितकाच त्याला मिळालेला हा विकेट्सही खास आहे. गेल्या ११ आयपीएल डावांमध्ये अर्शदीपला पॉवरप्लेमध्ये एकही विकेट्स घेता आली नव्हती. सुमारे २१.१ षटकांच्या प्रतीक्षेनंतर त्याला हे यश मिळाले आहे. याआधी २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याने एडन मार्करमची विकेट पॉवरप्लेमध्ये घेतली होती. या हंगामात अर्शदीपच्या फॉर्मबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, त्याने या विक्रमी कामगिरीने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.





